मोदींच्या नेतृत्त्वाखाली आपण स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत साकारू : फडणवीस

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – पुढील पाच वर्षात मोदींच्या नेतृत्त्वाखाली आपण स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत साकारू शकतो असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 2014 ला आपण इतिहास घडवला, त्याचे आपण साक्षीदार होतो. आता 2019 च्या निवडणुकाही आपल्याला अशाच ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार व्हायचे आहे. ही निवडणूक 2014 च्या परिवर्तानवर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक ठरणार आहे. विरोधकांपुढे देशाचा विकास हे ध्येय नाही. भारतात सामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन व्हावं अशी विरोधकांची मुळीच इच्छा नाही असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

60 वर्षात झालेले खड्डे एकदम बुजवता येत नसतात. काँग्रेसने 60 वर्षात केलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरवात तर झाली ही चांगली गोष्ट असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पुढे फडणवीस म्हणाले की, मोदी हटाव हेच विरोधकांचे लक्ष आहे. जालन्यातील प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. विरोधकांना आपलं अस्तित्व संपण्याची भीती आहे. आपले अस्तित्व टिकवण्यासाठीच विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

विरोधकांकडे निती, नियम आणि धोरण नाही. आगामी निवडणुक ही एका पर्वाची निवडणुक असेल. देशात गरिबांच्या नावाने राजकारण करण्याचे काम विरोधक करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. खोटं बोल पण रेटून बोल ही विरोधकांची रणनीती आहे. आमच्या सरकारच्या काळात 1600 कोटींचा विमा शेतकऱ्यांना दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.