पोहण्यात तरबेज असतानाही झाला पाण्यात बुडून मृत्यू

वाशिम : पोलीसनामा ऑनलाइन – वाशिममध्ये भर जहाँगिर परिसरात विहिरीमध्ये पोहायला गेलेल्या 38 वर्षीय प्रकाश साहेबराव आंधळे या युवकाचा बुडून मृत्यू झाला. या युवकाचा मृतदेह तब्बल 21 तासांनंतर शोधण्यात संत गाडगे बाबा आपत्कालीन बचाव पथकाला यश आले.

रविवारी दुपारी 4 च्या दरम्यान प्रकाश आंधळे पोहण्यासाठी विहिरीवर गेला. खुप वेळ होऊनही पाण्याबाहेर न आल्याने तिथल्या काही मुलांनी विहिरीमध्ये त्याचा सायंकाळपर्यंत शोध घेतला. परंतु त्याचा शोध लागला नाही. प्रकाश आंधळे हा युवक पट्टीचा पोहणारा असल्याने तो पाण्यात बुडणार नाही, असे ग्रामस्थांना वाटत होते. पण पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाचे दीपक सदाफळे व त्यांच्या टीमने प्रकाश आंधळेचा मृतदेह विहिरीतून शोधून काढला. प्रकाश आंधळे हा मजुरी युवक असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून पुढीचा तपास सुरू आहे.

गावात कोणीही बुडालं तर प्रकाश यांना मदतीसाठी बोलावले जायचे. पाण्यात एखाद्याचा मृतदेह शोधायचा असल्यास प्रकाश यांना प्राचारण करण्यात यायचं. तेव्हा पाण्यात बुडून प्रकाश यांचा मृत्यू झाला, यावर गावकऱ्यांचा अजूनही विश्वास बसत नाहीये. पोलिसांनी या सगळ्या बाबींची नोंद घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/