‘या’ कारणामुळं भारतीयांवर नाही झाला ‘कोरोना’चा जास्त परिणाम, समोर आली आर्श्चयकारक गोष्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : जर तुम्हाला असे वाटत असेल, की भारतात कोरोना व्हायरस अन्य लोकसंख्येच्या तुलनेने पसरण्याचे कारण केवळ सरकारच्या निर्देशांचे पालन करणे आहे, तर बहुतेक तुम्ही चुकीचे समजत आहात. आम्ही हे अशासाठी म्हणत आहोत, कारण नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे, की भारतात कोविड-19 चा संसर्ग कमी पसरण्याचे कारण भारतीयांची अस्वच्छ म्हणजे घाणेरडे राहाण्याची सवय आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे, की भारतातील लोकांच्या अस्वच्छ राहाण्याने त्यांची इम्यूनिटी स्ट्राँग केली आहे. कोरोना प्रकरणांमध्ये भारत काही दिवसांपूर्वी जगात दुसर्‍या क्रमांकावर होता. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या खूप कमी आहे. या संशोधनाने भारतीयांच्या संदर्भात महामारीकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला आहे. मात्र, संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे, की आम्ही म्हणत नाही की केवळ खराब आरोग्य आणि अस्वच्छताच कोविड 19 संसर्ग रोखण्याचे कारण आहे.

रिचर्सनुसार, हाय मायक्रोबियलपासून एक्सपोज होणे कोविड19 च्या संसर्गाला रोखण्यासाठी उपयोगी ठरू शकते. पण, संशोधक कोणत्याही अस्वच्छ सवयी अवलंबणे किंवा फॉलो करण्याची मागणी करत नाही आणि कोविड संसर्ग रोखण्यासाठी हा पर्याय असल्याचेही ते मानत नाहीत. ते या रिसर्चची पूर्णपणे पुष्टीही करत नाहीत. पण आता हे पहायचे आहे, की जर हा अभ्यास खरा आहे तर भारतीयांनी आपल्या सवयींमध्ये सुधारणा करू नये का? खरोखरच केवळ खराब आरोग्य आणि अस्वच्छता कोविडला रोखण्यासाठी पुरेसे आहे का?