INCOME TAX SLABS, BUDGET 2020 : अर्थमंत्री सितारमण यांची मोठी घोषणा ! 5 स्लॅबमध्ये इन्कम टॅक्सची विभागणी, जाणून घ्या तुम्हाला किती लागणार IT

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी करदाते आणि नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने आयकरला (इनकम टॅक्स स्लॅब) पाच भागात वाटले आहे. कररचनेत बदल करण्यात आल्यानंतर आता 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर (टॅक्स) द्यावा लागणार नाही.

आयकराचे 5 स्लॅब –
1)  5 ते 7.5 लाखापर्यंत उत्पन्न असल्यास 10 टक्के कर
2)  7.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर 15 टक्के कर
3) 10 ते 12.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर
4) 12.5 ते 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास 25 टक्के कर
5)  15 लाख आणि त्यापेक्षा आधिक उत्पन्न असल्यास 30 टक्के कर

अटीनुसार नवे बदल –
नवे बदल अटीनुसार आहेत. यासाठी तुम्हाला गुंतवणूकीवर मिळणारा लाभ सोडावा लागेल. जर तुम्ही गुंतवणूकीच्या सूटीचा लाभ घेणार असाल तर कर जुन्या दरांप्रमाणेच असतील. एकूण 15 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना 78 हजार रुपयांचा फायदा होईल.

सध्याचा स्लॅब किती –
सध्याच्या घडीला टॅक्स स्लॅबनुसार 2.5 – 5 लाख उत्पन्नावर 5 टक्के कर द्यावा लागतो. याच प्रकारे 5 – 10 लाख रुपयांवर 20 टक्के तर 10 लाख आणि त्यापेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कराची तरतूद आहे.

टॅक्सपेअर चार्टर बनवणार –
करासंबंधित कोणालाही अडचणी येणार नाही. कायद्यानुसार टॅक्स पेअर चार्टर तयार करण्यात येईल. लोकांच्या मनातील कराची भीती संपवण्यात येईल. टॅक्स कलेक्शनसाठी आर्टिफिशियल इंटेलीजेंसचा वापर केला जाईल. सरकार करदात्यांना होणारा त्रास कमी करेल. तर टॅक्सचोरी करणाऱ्यांसाठी सक्त कायदा केला जाईल.

मागील अर्थसंकल्पात सरकारने करदात्यांना 2.5 लाख रुपयांची टॅक्स री-बेट केला होता –
निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान 60 लाख नवे करदाते जोडल्या गेले. या दरम्यान 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर जमा झाला. मागील अर्थसंकल्पात सरकारने 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री ठेवण्यात आले होते. तर 2.5 लाख ते 5 लाखाच्या उत्पन्नावर 5 टक्के कर निश्चित केला होता. याशिवाय 5 लाख ते 10 लाखाच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 10 लाखापेक्षा जास्तीच्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्सची घोषणा केली होती.