कंपन्यांना द्याव्या लागणार कर्मचाऱ्यांना ‘या’ सुविधा ; ‘आरोग्य’ तपासणी ते ‘पाळणाघर’ पर्यंतची सोय होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय सरकारच्या कॅबिनेटने कर्मचाऱ्यांच्या हितासंबंधित एक विधेयक पारित केले आहे. कॅबिनेटकडून नुकतच हेल्थ अ‍ॅण्ड वर्किंग कंडीशन कोड बिल २०१९ ला मंजुरी देण्यात आली आहे. हा कायद्या लागू झाल्यास कंपन्याना आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. यामध्ये कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे वर्षाला आरोग्या तपासणी करावी लागणार आहे.

याशिवाय कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कॅटिंग आणि त्यांच्या मुलांसाठी पाळणाघराची (क्रेच) सुविधा उपलब्ध करुन द्यावी लागणार आहे. श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी माहिती देताना सांगितले की सरकारची प्रार्थमिकता कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे.

४० कोटी कर्मचाऱ्यांना फायदा –
सरकारने ३ श्रम कायद्यांना मिळून एक कायदा बनवला आहे. या कायद्याने जवळपास ४० कोटी कर्मचाऱ्यांना फायदा मिळणार आहे. या नव्या विधेयकात १७८ रुपये प्रतिदिन मजुरी प्रत्येक महिन्याला ठरलेल्या तारखेला देणे आवश्यक आहे. तशी तरतूद यात करण्यात आली आहे.

महिलांच्या कामाच्या वेळ –
हे विधेयक २ ते ३ दिवसात लोकसभेत मांडण्यात येणार आहे. यात कर्मचाऱ्यांना कंपनीकडून अपॉइंटमेट लेटर देणे आवश्यक करण्यात आले आहे. तसेच हे विधेयक महिला कर्मचाऱ्यांची सुविधा आणि सुरक्षा लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. यात महिलांच्या कामाच्या वेळेबाबत माहिती देण्यात आली आहे. यात महिलांच्या कामाचा वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ७ दरम्यान ठेवण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like