HM अमित शहा रुग्णालयात, किरकोळ शस्त्रक्रियेनंतर ‘डिस्चार्ज’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे सध्या गुजरातच्या खासगी दौर्‍यावर आहेत. दरम्यान, आज सकाळी अचानक शाहने खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. किरकोळ शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं, अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली.

अमित शहा यांना बुधवारी सकाळी 9 वाजता अहमदाबादमधील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया केली. दुपारी साडेबारा वाजता त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यांच्या घशाच्या मागील छोट्या गाठीवर (‘लिपोमा)’ शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

अमित शहा यांनी यापूर्वी मंगळवारी दिल्लीत जम्मू-काश्मीरच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. सूत्रांनी सांगितले की, शाह खासगी दौर्‍यावर असले तरी गांधीनगरचे खासदार त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांसह सरकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. अमित शाह बुधवारी म्हणजे आज गुजरातला वैयक्तिक कारणांसाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्याचे कारण अस्पष्ट होते. मात्र आज ते गुजरातमध्ये उपचारासाठी आल्याचे स्पष्ट झाले.

आरोग्यविषयक वृत्त