स्वबळावर सरकार बनवू शकतो सरकार, पण मैत्री तोडण्याची सवय नाही, भाजपानं JDU सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बिहारमध्ये सध्या निवडणूकीचा डंका वाजण्याची प्रतीक्षा आहे, पण राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीचा गदारोळ दिसू लागला आहे. राजकारण्यांची विधानं असो किंवा पक्षांतराच्या बातम्या असो निवडणुकांशी संबंधित प्रत्येक गोष्टीला आता वेग आला आहे. सर्व पक्ष निवडणूक युतीबाबत चिंतेत दिसत आहेत. याच दरम्यान आरा येथील भाजप खासदार आणि केंद्रीय ऊर्जामंत्री आरके सिंह यांनीही बिहारमधील युतीशी संबंधित एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह म्हणाले कि आम्ही स्वबळावर बिहारमध्ये सरकार स्थापन करू शकतो, याबद्दल काहीही शंका नाही. पण आमची १९९६ पासून जेडीयूशी भागीदारी आहे आणि आम्हाला ती तोडायची नाही किंवा तसे करायचेही नाही. आम्ही आमच्या मित्रांना सोडत नाही.

भाजप खासदार आर के. सिंह यांच्या विधानावरून असे दिसते की, यावेळी एनडीएमधील जागावाटपाचे फॉर्म्युला काहीसा बदललेला दिसू शकतो. ते पुढे म्हणाले की, जागावाटपामध्ये आमचा वाटा लवकरच निश्चित होईल. ही प्रक्रिया सहजतेने समाप्त होईल, कारण आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजप आणि पीएम मोदींच्या मतांचा आधार स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे जागा विभागणी त्या आधारेच झाली पाहिजे.

निवडणुकीच्या समीकरणांमध्ये व्यस्त आहे भाजप

तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप आक्रमक निवडणूक प्रचाराला धार देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर राजकीय समीकरण बनवण्यासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते पुढच्या आठवड्यात बिहार दौर्‍यावर जाणार आहेत. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यापासून ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप संघटनेचे सरचिटणीस बी.एल. संतोष पुढच्या आठवड्यात पाटणा येथे असतील.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा ८ सप्टेंबर रोजी बिहारच्या दोन दिवसीय दौर्‍यावर पाटणा येथे पोहोचतील, तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि बिहारचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस ९ सप्टेंबरला पाटणाला पोहोचतील. या व्यतिरिक्त भाजप संघटनेचे मंत्री बी.एल. संतोष अध्यक्षांच्या दौर्‍याच्या एक दिवस आधी म्हणजे ७ सप्टेंबर रोजीच पाटणाला जाणार आहेत. तसेच बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी यापूर्वीच तेथे उपस्थित आहेत.