Covid-19: ‘महामारी’ विरुद्ध लढा देण्यासाठी तयार नव्हतं ‘ब्रिटन’, लीक झाली गोपनीय कागदपत्रे

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   ब्रिटन कोणत्याही साथीसारख्या आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार नव्हता. अलीकडे काही लीक झालेल्या गोपनीय कागदपत्रांवरून हे उघडकीस आले आहे. एक्सरसाइज सिग्नस नावाच्या या गोपनीय विश्लेषणास 2016 मध्ये पार पाडले गेले होते. यामध्ये सर्व राष्ट्रीय, प्रादेशिक प्रशासन, पोलिस आणि अन्य संघटनांच्या तयारीचे मूल्यांकन करण्यात आले होते.

आपत्तीचा सामना करण्यासाठी संयुक्त रणनीतीचा अभाव: 57 पृष्ठांचा अहवाल

57 पानाच्या या अहवालात असे म्हटले आहे की सार्वजनिक आरोग्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी संयुक्त रणनीतीचा अभाव आहे. अशाप्रकारची आपत्ती उद्भवल्यास सामाजिक देखभाल यंत्रणेच्या क्षमतेवरही या अहवालात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. यात असे म्हटले गेले आहे की सोशल सिस्टम क्वचितच एखाद्या आपत्तीच्या स्थितीत असे काम करू शकेल, जशी अपेक्षा असते.

नियोजन, धोरण आणि क्षमता पातळीवर ब्रिटनची तयारी साथीच्या रोगासाठी पुरेशी नाही

कागदपत्रांत म्हटले आहे की, ‘नियोजन, धोरण आणि क्षमतेच्या पातळीवर ब्रिटनची तयारी अशा साथीच्या रोगासाठी पुरेशी नाही, ज्याने संपूर्ण देश आणि सर्व क्षेत्रांवर परिणाम होईल.’ कागदपत्रे उद्धृत करताना येथील एका वृत्तपत्राने असे म्हटले आहे की या सर्वेक्षणांच्या निकालांवरुन अहवालात म्हटले गेले होते की एखाद्या साथीच्या रोगाशी लढा देण्याच्या तयारीच्या वेळी या गोष्टीला चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे की आरोग्याशी संबंधित साथीच्या स्थितीत लोकांची प्रतिक्रिया काय असेल आणि त्यांचे वर्तन कसे असेल.