‘कोरोना’ व्हायरसच्या संसर्गाने रोगप्रतिकारशक्ती कमजोर झाल्याने Nervous सिस्टम होते प्रभावित

लंडन : वृत्तसंस्था –  एका नव्या शोधानुसार, कोरोना व्हायरसच्या संसर्गाने स्नायुतंत्र (नर्व्ह सिस्टम) प्रभावित होते. यामुळे नर्व्ह सिस्टम संबंधी अनेक रोग होतात, जसे की – बेशुद्धीत बोलणे, डोक्यात सूज, स्ट्रोक, नसांचे नुकसान होणे इत्यादीचा समावेश आहे. रोगांची ही सर्व लक्षणे थेट कोविड-19 मुळे दिसत नाहीत, परंतु यामुळे रोगप्रतिकारशक्ती (इम्यून सिस्टम) कमजोर झाल्याने नर्व्ह सिस्टमसाठी धोका वाढतो.

जरनल ब्रेनमध्ये प्रकाशित या शोधात कोरोना संसर्गामुळे एक दुर्मिळ स्थिती निर्माण होते. ज्यामध्ये जळजळ आणि सूजेची समस्या होते. या दुर्मिळ स्थितीला ऐडम म्हणतात. ही स्थिती या जागतिक महामारीची लागण झाल्यानंतरच निर्माण होते.

कोरोनाच्या वयस्कर रूग्णांमध्ये ऐडमची लक्षणे
ब्रिटनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या संशोधकांसह अनेक शास्त्रज्ञांनी म्हटले की, त्यांना प्रत्येक महिन्याला एक वयस्कर कोरोना रूग्णात ऐडमची लक्षणे आढळून आली आहेत, परंतु नंतर दिसून आले की, ही लक्षणे प्रत्येक आठवड्यात एका वयस्कर रूग्णात दिसून येऊ लागली. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

संशोधनानुसार नॅशनल हास्पिटल फॉर न्यूरोलॉजी अ‍ॅण्ड न्यूरोसर्जरीमध्ये कोरोना रूग्णांमध्ये नर्व्ह सिस्टम प्रभावित करणारी लक्षणे 43 लोकांमध्ये (16-86 वर्ष) आढळली आहेत.

कोरोना रूग्णांना श्वास घेण्यास होतो अतिशय त्रास
संशोधनात काही रूग्णांना श्वास घेण्यात अतिशय त्रास होत असल्याचे दिसून आले. तसेच नर्व्ह सिस्टमशी संबंधित त्रासदेखील प्रामुख्याने होते. संशोधनात दहा प्रकरणे मेंदूच्या त्रासाची दिसली, ज्यामध्ये कोरोना रूग्ण बेशुद्धावस्थेत बडबडतो. बारा प्रकरणात मेंदूतील सूज आणि आठ अन्य प्रकरणे नसांचे नुकसान झाल्याची होती. अनेकदा रूग्णांमध्ये नर्व्ह सिस्टम खुप प्रभावित होते. सह संशोधक मायकल जंडी यांनी म्हटले की, ही अशी जागतिक महामारी ठरू शकते, ज्यामध्ये मेंदूचे मोठे नुकसान होते.