University Campus Colleges Starting Offline In Maharashtra | राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार – मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – University Campus Colleges Starting Offline In Maharashtra | मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा (Schools), महाविद्यालये (Colleges) बंद होते.
मात्र परिस्थिती नियंत्रित आल्याने राज्यातील निर्बंध उठवण्यात आले आहेत.
त्यामुळे मागील महिन्यात शाळा, महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु झाली आहेत.
दरम्यान अद्याप राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस (University Campus) बंद होते.
आता युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा सुरु होणार असून सर्व कॉलेजेसही ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहे.
याबाबत माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

 

मागील दोन वर्षांपासून ओस पडलेले युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार आहे.
याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन (Offline Classes) पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
त्यामुळे राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालय ऑफलाईन सुरु राहणार आहे.

दरम्यान, याबाबत माहिती देताना पुढे मंत्री उदय सामंत म्हणाले की, ”ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे 2 डोस (Corona Vaccination) झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऑफलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे.
पण, ज्यांनी अजूनही कोरोना लस घेतली नाही अशा विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार नाही.
अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात येणार असल्याचे,” ते म्हणाले.

 

Web Title :- University Campus Colleges Starting Offline In Maharashtra | university campus colleges starting offline in maharashtra said minister uday samant

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा