Birthday SPL : YouTube साठी ‘कॅरी मिनाटी’नं सोडली होती 12 वी परीक्षा, ‘अशी’ होती वडिलांची ‘रिअ‍ॅक्शन’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – युट्युबवर कॅरी मिनाटी हे नाव बहुतेक लोकांना माहितच असेल. आज (शुक्रवार दि 12 जुलै 2020) कॅरीचा 21 वा वाढदिवस आहे. त्याचं खरं नाव अजय नागर आहे. फरिदाबादच्या अजयचे CarryMinati आणि CarryIsLive असे दोन चॅनल्स आहेत. अलीकडे युट्युब विरूद्ध टिकटॉक वाद झाला तेव्हा कॅरी मिनाटी हे नाव घराघरात पोहोचलं. कॉमेडियन आणि रॅपर अशीही त्याची ओळख आहे. आज आपण त्याच्या बद्दलच्या अननोन फॅक्ट जाणून घेणार आहोत.

कॅरीन युट्युबसाठी आपलं शिक्षण सोडलं होतं. त्यानं चक्क 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला होता. खास बात अशी की घरच्यांनीही त्याला सपोर्ट केला होता. वर्षभर युट्युबमध्ये बीजी असल्यानं त्यानं अभ्यास केला नव्हता. त्याचा अभ्यास काहीच झाला नव्हता. इकॉनॉमिक्सच्या पेपरच्या एक दिवस अगोदर त्यानं वडिलांना सांगितलं होतं की, तो परीक्षा देणार नाही. वडिलांनीही त्याचं ऐकलं. नंतर मात्र त्यानं त्याचं हे शिक्षण पूर्णदेखील केलं. आज कॅरी युट्युबवर खूप फेमस आहे. खिल्ली उडवणारे आणि लाईव्ह गेमिंगच्या व्हिडीओसाठी तो ओळखला जातो. अलीकडेच त्याचं यल्गार हे रेप साँग आलं होतं जेखूप गाजलं.

कॅरीबद्दल अनेकांना माहिती नसेल परंतु वयाच्या 10 व्या वर्षापासूनच त्यानं युट्युबवर व्हिडीओ पोस्ट करायला सुरुवात केली होती. 2014 मध्ये त्यानं CarryMinati चॅनल सुरू केलं. 2017 मध्ये त्यानं CarryIsLive हा चॅनल सुरू केला. 2019 मध्ये त्यानं युट्युबवर Pewdiepie विरोधात Bye Pewdiepie हे गाणं सादर केलं. हे गाणं खपू गाजलं. 24 तासातच या गाण्याला 5 मिलियन्स व्ह्युज मिळाले. 2019 च्या टाईम मॅगेझिनच्या नेक्स्ट जनरेशन लिडर्स 2019 च्या यादीत तो 10 व्या स्थानावर होता.