Unlock 5.0 Guidelines : अनलॉक 5.0 ची गाइडलाईन जारी, सिनेमागृह उघडणार तर शाळा-कॉलेजबाबत राज्य सरकार निर्णय घेणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय गृह मंत्रालयानं अनलॉक 5.0 ची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्स आसन व्यवस्थेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, मल्टीप्लेक्स आणि इतर एंटरटेंमेंट पार्क उघडले जाणार आहे. स्विमींग पूल हे खेळाडूंच्या ट्रेनिंगसाठी उघडले जाणार आहे. सिनेमा हॉल, थिएटर्स, मल्टीप्लेक्स संदर्भात लवकरच माहिती आणि प्रसारण मंत्रत्तलय गाईडलाईन जाहीर करणार आहे. 15 ऑक्टोबरनंतर अनलॉक 5 मध्ये शाळा आणि कोचिंग क्लासेस उघडण्याचा निर्णय राज्य सरकारकडे सोपविण्यात आला आहे. त्यासाठी पालकांनी परवानगी आवश्यक असणार आहे. दरम्यान कंन्टेंमेंटझोनमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन असणार आहे.

महाराष्ट्रात कंन्टेंमेंट झोनमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत Lockdown, 5 ऑक्टोबरपासून रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, कोरोनातून बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या देखील लक्षणीय आहे. राज्य आणि केंद्र सरकार व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यातील कंन्टेंमेंट झोनमध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार हे 5 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास 50 टक्के कपॅसिटीवर परवानगी दिली आहे. म्हणजे हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बारमधील उपस्थिती ही 50 टक्के ठेवली जाणार आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडयापासून हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट लॉकडाऊनमुळं बंद होती. तेव्हापासून हॉटेल व्यावसायिकांवर मोठं संकट कोसळलं आहे. दरम्यान, आता अनलॉक 5 चालू आहे. यापुर्वी इतर काही गोष्टींची हळूहळू सुरूवात करण्यात आली होती. आज अखेर राज्य सरकारकडून हॉटेल्स, बार आणि रेस्टॉरंट 50 टक्के कपॅसिटीनं उघडण्यास परवानगी देण्यात आलील आहे. 5 ऑक्टोबरपासून हॉटेल्स आणि बार 50 टक्के कपॅसिटीनं सुरू होणार आहेत.