अनलॉकचे नियम आणखी महिनाभर, केंद्राची राज्य सरकारला सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘अनलॉक-६’ चे दिशानिर्देश जारी करताना मागील दिशानिर्देश यापुढेही चालू ठेवावेत असे केंद्रीय गृहमंत्रालयाने आज सांगितले. केंद्र सरकारने ‘अनलॉक-५’मधील कोरोना दिशानिर्देश आणखी महिनाभर पुढे चालू ठेवण्यात यावेत, असे स्पष्ट केलं आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत तेवढ्याच कडकपणे व सक्तीने करावी, अशाही सूचना राज्य सरकारांना करण्यात आल्या आहेत.

सिनेमागृहे, मल्टीप्लेक्‍स, नाट्यगृहे (५० टक्के प्रेक्षक क्षमतेसह) सुरू होणार आहे. शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास राज्यांना अधिकार देण्यात आले आहे ; मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी परवानगी अत्यावश्‍यक आहे. जलतरण तलाव, जिम सुरू होणार आहेत. हे सर्व सुरू होत असले तरी केंद्राच्या कारवाई निर्देशांचे (एसओपी) पालन अनिवार्य करण्यात आले आहे.

दिवाळी आणि अन्य सणासुदीच्या काळात आरोग्य नियमांची ऐशीतैशी होण्याची साधार भिती व्यक्त केली जात आहे होते. त्यामुळेच कोरोना दिशानिर्देश पुढच्या महिनाअखेरपर्यंत चालू ठेवण्यास सरकारने सांगितले. कोरोनाचे प्रमाण जास्त असलेल्या प्रतिबंधित भागांतील (कन्टेंनटमेंट झोन) लॉकडाउनची अंमलबजावणी ३० नोव्हेंबरपर्यंत तेवढ्याच कडकपणे व सक्तीने करावी, अशाही सूचना राज्य सरकारांना करण्यात आल्या आहेत.

देशभरात १० राज्ये वगळता कोरोनाचा दुष्प्रभाव कमी होत चालल्याची अलीकडची आकडेवारी असली तरी अमेरिका – युरोपमधील अनुभवाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही धोका स्वीकारण्यास केंद्राची तयारी नाही.