Unmesh Patil BJP – Shivsena UBT | जळगाव: भाजपचे खासदार उन्मेष पाटील ‘उबाठा’मध्ये जाणार

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Unmesh Patil BJP – Shivsena UBT | जळगाव लोकसभा मतदारसंघाचे (Jalgaon Lok Sabha 2024) भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना भाजपने डावलत स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट नाकारल्यापासून पाटील पक्षावर नाराज होते. (Unmesh Patil BJP – Shivsena UBT)

महाविकास आघाडीच्या (MahaVikash Aghadi) जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे. त्यामुळे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात जाण्याच्या दृष्टीने गाठीभेटी घेतल्या. आज सकाळीच त्यांनी आधी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि नंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अशातच उन्मेश पाटील यांचा आमच्या पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून उद्या पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदार संघात मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन

वंचित पुण्यातून उमेदवार देणार, वसंत मोरेंना उमेदवारी देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध

पिंपरी : उद्योगपती मालपाणी कुटुंबाचा सदस्य असल्याचे भासवून महिलेची 93 लाखांची फसवणूक, आरोपी गजाआड

Pune Cheating Fraud Case | नोकरी लावण्याच्या बहाण्याने पुण्यात युवकाला 28 लाखांचा गंडा, दाम्पत्यावर FIR

Pune Traffic Police Action On Modified Silencers | ‘बुलेट राजा’वर वाहतूक शाखेची वक्र दृष्टी! 619 बुलेट वर कारवाई, कर्कश आवाजाचे सायलेन्सर जप्त

विश्रांतवाडी, वानवडी, हडपसर परिसरात घरफोडी, सोन्याच्या दागिन्यासह दोन कारची चोरी

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटात
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या इतिहासाला उजाळा; अभिनेते रणदीप हुडा यांनी पाळला
पुनीत बालन यांना दिलेला शब्द (Video)