उन्नाव : दोषी निलंबित MLA कुलदीप सेंगरला न्यायालय सुनावणार 20 डिसेंबरला ‘शिक्षा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी ठरवण्यात आलेल्या भाजपचा माजी आमदार कुलदीप सिंह सेंगर याला 20 डिसेंबरला शिक्षा सुनावणार आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टने मंगळवारी सकाळी सेंगरला शिक्षा सुनावली. यात दरम्यान सीबीआयने दोषी सेंगरला आजीवन तुरुंगवासाची शिक्षेची मागणी केली होती. सीबीआयने सांगितले की हे प्रकरण फक्त बलात्काराचे नाही, ही एका मानसिक त्रासाची आहे. न्यायालयाने सीबीआयला विचारले की या प्रकारच्या प्रकरणात आतापर्यंत किती नुकसान भरपाई देण्यात आली आहे. यावर सीबीआयने सांगितले की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वात पाहू की अशा वेळी पीडितेला किती नुकसान भरपाई देण्यात येऊ शकते.

सेंगरच्या वकीलांनी सांगितले, कायम लोकांची सेवा केली
सेंगरच्या वकीलांना न्यायालयात सांगितले की त्यांचे वय 54 आहे, आणि त्याचा संपूर्ण कार्यकाळ पाहिला तर 1988 पासून जनतेसाठी काम करत आहेत. 1995 पासून 2000 पर्यंत ब्लॉक लेवलचे ते सदस्य होते. त्यांनी कायम लोकांचा सेवा केली. 2002 पासून ते जनतेच्या आग्रहाखातेर निवडणूक लढले आणि आमदार झाले. वकीलांनी सांगितले की त्यांनी आपल्या भागात अनेक संस्था बनवल्या. विकास कामे केली. तसेच त्यांच्यावर जनतेने कधीही कोणताही आरोप लावला नाही. त्यांच्या दोन मुली देखील आहेत, ज्या लग्नाच्या वयाच्या आहेत.

सोमवारी ठरवले होते दोषी
सोमवारी न्यायलायाने आपला निर्णय देत सेंगर यांना दोषी ठरवले होते, तर एक आरोपी असलेल्या शशि सिंह यांना न्यायालयाने निर्दोष सोडले. शशि सिंह यांच्यावर आरोप होता की त्यांनी पीडितेला नोकरी देण्याच्या बाहाण्याने सेंगर यांच्याकडे नेले होते, त्यानंतर पीडितेचा बलात्कार झाला.

सेंगर यांच्या आणखी तीन गुन्हे दाखल
कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर दिल्ली विशेष सीबीआय न्यायालयात आणखी तीन प्रकरणांवर सुनावणी सुरु आहे. आता सेंगर बलात्काराच्या प्रकरणी दोषी आहेत. सेंगरला 14 एप्रिल 2018 साली ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने शशि सिंह यांनी देखील संशयाच्या घेऱ्यात ठेवले होते. शशि यांच्या विरोधात योग्य ते पुरावे नसल्याने त्यांना सोडण्यात आले.

पीडितेवर लावण्यात आले होते खोटे आरोप
सोमवारी न्यायालयाने आपला निर्णय देत सांगितले की 2017 मध्ये जेव्हा हे प्रकरण समोर आले होते तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. या घटनेनंतर ती घाबरली होती. तिला सतत धमक्या येत होत्या. तिच्या कुटूंबाला मारण्याची धमकी देण्यात आली होती. ती एका पॉवरफुल व्यक्तीशी लढा देत होती, यामुळे तिच्या कुटूंबावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/