घरात एकटीच होती महिला, पतीच्या मित्रांनी ‘बंदूक’ दाखवून केला सामूहिक ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशच्या बरेली शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका माणसाच्या पत्नीवर त्याच्याच मित्रांनी बंदूक दाखवून सामूहिक बलात्कार केला. घटना घडली तेव्हा महिला घरात एकटीच होती. नेमक्या त्याच वेळेस चार आरोपी घरात घुसले आणि महिलेस बंदूक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने विरोध केल्यावर आरोपींनी महिलेचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने रविवारी पोलीस स्टेशनला जाऊन या संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीनुसार चार आरोपी जे तिचे शेजारी आहेत, ती एकटी असताना घरात आले आणि चौघांनी तिच्यावर बंदूक ताणली आणि तिच्यावर बलात्कार केला.

एक रिपोर्टनुसार, महिलेने जेव्हा विरोध केला तेव्हा आरोपींनी तिचा गळा कापण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने आरडाओरडा करून आपली सुटका केली. यानंतर चारही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जाण्यापूर्वी आरोपींनी पीडित महिलेला घटनेची तक्रार दिल्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देखील दिली.

या घटनेनंतर पीडित महिलेने स्वतः रविवारी बरेलीचे पोलिस अधीक्षक (गुन्हे) आर.के. भारतीय यांची भेट घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. दरम्यान भारतीय यांनी या घटनेचा तपास करून एफआयआर नोंदविण्याचे आदेश सिरौली पोलिस स्टेशनचे एसएचओ संजय गर्ग यांना दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या नवऱ्याकडे एक किलो चरस सापडले, त्या प्रकरणी त्याला पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला मुरादाबाद जिल्हा कारागृहात बंद करण्यात आले आहे. महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिच्या पतीविरुद्ध कट रचला गेला होता आणि ड्रग्सच्या तस्करी प्रकरणात त्यास जाणूनबुजून अटक करण्यात आले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही चारही आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम ३७६डी (सामूहिक बलात्कार), कलम ४५२ (हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने घरात प्रवेश करणे) आणि कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल केले आहेत. आम्ही महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे आणि रिपोर्टची प्रतीक्षा आहे. हे सर्व आरोपी पीडित महिलेच्या पतीचे मित्र आहेत आणि ते घटना घडल्यानंतर फरार झाले आहेत. त्यांना अटक करण्यासाठी आम्ही एक पथक स्थापन केले आहे.”

फेसबुक पेज लाईक करा –