राम मंदिर उभारण्याची मागणी घेऊन देशभरातील साधू-संत अयोध्येत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2014 साली मोदी सरकार सत्तेत येताना राम मंदिर उभारण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र मोदींनी आपले वचन अजूनही पूर्ण न केल्याने देशातील साधूंनी त्याच्याकडे तशी मागणी केली. परंतू 5 वर्षात त्याबाबत कोणताही निर्णय आला नाही. आता पुन्हा मोदी सरकार सत्तेत आल्याने त्या मागणीचा जोर वाढला आहे. त्यामुळे आज राम जन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास महाराज यांच्या 81 व्या जन्मोत्सवाच्या निमित्त अयोध्येत संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले.

राम मंदिर निर्माणावर चर्चा –
याच संमेलनात मंदिर निर्माण या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. ह्या संमेलनाचे आयोजन राम जन्मभूमी वर मंदिर निर्माणच्या विषयावरच चर्चा करण्यासाठी करण्यात आले आहे. याबरोबरच भारताची वर्तमान स्थिती, दहशतवाद, सामाजिक समन्वय, मठ मंदिरांची सुरक्षा आणि विकास या विषयांवर देखील चर्चा करण्यात येणार आहे.

राम जन्मभूमि मामला सर्वोच्च्य न्यायालयात विचारधीन आहे, असे असून देखील वेळोवेळी मंदिर निर्माणाबाबत मागणी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपुर्वी विश्व हिंदू परिषदेने दावा केला होता की राम मंदिर कार्य येत्या 18 महिन्यात सुरु झाले पाहिजे. त्यामुळे याच मुद्यावर पुन्हा एकदा चर्चाेसाठी संत संमेलन बोलावण्यात आले आहे.

विहिंपची 18 महिन्यात राम मंदिर उभारण्याची मागणी –
लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजपला मिळलेल्या प्रचंड विजयानंतर अयोध्या राम मंदिरासाठी पुन्हा एकदा मागणी वाढू लागली आहे. या आधी 5 जूनला विहिंप चे कार्यकारी आधिकारी अलोक कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांची संघटना आता राम मंदिराच्या निर्णयासाठी अनिश्चितकाळापर्यंत थांबू शकत नाही, आणि संघटनेने एनडीए सरकारला दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देणार आहोत.

त्यांनी असे देखील सांगितले की, हे तर नक्की आहे, की भगवान रामाच्या जन्मस्थानावर फक्त राम मंदिरच बनणार आणि अयोध्येच्या सांस्कृतिक सीमांमध्ये कोणतीही मस्जिद नसेल.

विहिंपच्या भूमिकेमुळे राम जन्मभूमीवर प्रकरण आधिक चिघळणार असे दिसते आहे, तसेच देशभरातील सर्व साधू संत राम मंदिराच्या मुद्यावरून एकत्र येत राम मंदिर उभारण्याची मागणी करत आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
#Savethedoctors : देशभरातील डॉक्टर भीतीच्या सावटाखाली, सरकारचे दुर्लक्ष
घरगुती पद्धतीने ‘वजन’ करा झटपट कमी
मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक

You might also like