UPSC कडून ‘त्या’ उमेदवारांसाठी अत्यंत कठोर नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – UPSC दर वर्षी IAS, IPS आणि इतर पदांची भरती करण्यासाठी परिक्षा आयोजित करते. ज्यासाठी देशभरातून लाखो उमेदवार अर्ज करतात. परंतू त्यातील अनेक उमेदवार असे आहेत जे फॉर्म भरुन परिक्षा देत नाहीत. अशा उमेदवारांवर लगाम लावण्यासाठी UPSC लवकरच काही कठोर नियम करणार आहे.

तो अटेम्प्ट ग्राह्य धरणार
यूपीएससीने एक प्रस्ताव तयार केला आहे, ज्यात म्हणण्यात आले आहे की उमेदवार परिक्षेचा अर्ज भरतात मात्र परिक्षेसाठी उपस्थित राहत नाहीत. अशा उमेदवारांच्या अटेम्प्ट मध्ये कपात करण्यात यावी. म्हणजे इतर उमेदवारांच्या तुलनेत परिक्षेला उपस्थित न राहणारे उमेदवारांचे परिक्षा देण्याचे अटेम्प्ट कमी करण्यात येईल. यूपीएससीने सांगितले आहे की अर्ज भरुन सुद्धा परिक्षा न देणाऱ्या उमेदवारांची ती अनुपस्थिती अटेप्म्ट म्हणून मोजण्यात येणार आहे.

युपीएससीने सांगितले आहे की यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक होते. असे करण्यात आले नाही तर उमेदवार उगाचच फक्त अर्ज भरतील. असे असले करी आधिकृतपणे यूपीएसीने अजून नोटीस लागू केली नाही.

CSAT पेपर बंद होण्याची शक्यता
याच बरोबर UPSC ने सिविल सर्विसच्या परिक्षेत एप्टीट्यूट टेस्ट म्हणजेच CSAT चा पेपर घेणे बंद करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. युपीएसीने सांगितले आहे की हा पेपर असणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. रिजनिंग आणि इंग्रजीचे प्रश्न या पेपर मध्ये असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की यामुळे फक्त इंजिनियरिंगच्या आणि कान्वेंटच्या विद्यार्थ्यांना फायदा होते.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

Loading...
You might also like