Urfi Javed Controversy News | कपड्यांवर कमेंट केल्यानं सुजैन खानच्या बहिणीला उर्फी जावेदनं दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली – ‘तुम्ही केलं तर टेस्टफुल, मी घातलं तर घाणेरडं.’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed Controversy News ) सतत आपल्या बोल्‍डनेसनं परिपूर्ण असलेले फोटो शेअर करत असते. उर्फी बोल्ड (Urfi Javed Bold Photo) आणि हॉट (Urfi Javed Hot Photo ) सोबतच बिनधास्त आणि धाडसी सुद्धा आहे. ती नेहमीच आपल्या कपड्यांमुळं ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते. तर नुकतंच सुजैन खानची (Sussanne Khan) बहिण फराह खान अलीनं तिच्या कपड्यांवर टीका केली. मात्र याला उर्फीनं सडेतोड उत्तर (Urfi Javed Controversy News ) दिला आहे.

सुजैन खानची बहिण फराह खान अलीनं (Farah Khan Ali) उर्फीच्या ड्रेसिंग सेंसला वैतागून एक ट्विट (Farah Khan Ali Tweet) केलं होतं. या ट्विटमध्ये फराह खान अलीने लिहिलं होतं की, ‘बोलताना माफी मागते. कारण या मुलीला तिच्या अशा फॅशन सेन्समुळं कानाखाली मारण्याची गरज आहे. लोक तिला मस्करीवारी घेतात आणि तिला वाटते की, लोकांना तिचे ड्रेसिंग स्टाइल अत्यंत आवडते. तर आशा आहे मला, तुम्ही कोणी तिला ही गोष्ट समजावून सांगेल.’

https://www.instagram.com/p/CbmCAB-o0n3/?utm_source=ig_web_copy_link

या ट्टिटनंतर उर्फी (Urfi Javed ) शांत बसली नाही. तिनं फराह खान अलीला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. तर तिनं आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर फराह खान अलीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्याखाली लिहिला आहे की, ‘फराह खान अली मॅम, टेस्टफुल ड्रेसिंग म्हणजे नक्की काय असतं? आणि प्लीज माझ्यासाठी तुम्ही याला डिजाइन करा. आणि मला माहिती आहे की मी ज्या प्रकारे ड्रेस घालते, ते लोकांना आवडत नाही. तसेच मी कोणत्या प्रश्नचिन्हात जगत नाहीये. परंतु मी लोकांच्या विचाराची सुद्धा काळजी करत नाही.’

“तुम्ही डिझायनर कपडे घालतात. तर ते टेस्टफुल असतं. तुमच्या नातेवाईकांनी असे चित्रपट बनवले आहेत, ज्यामध्ये आईटम सॉन्ग करणाऱ्या मुली अत्यंत छोटे कपडे घालतात. ते तुम्हाला टेस्टफुल वाटतं? एक आइटम सॉन्गसाठी महिलाने बॉडीला सेक्सुलाइज करणं ठीक आहे का? तुम्हाला हे सगळ करण्याची गरज नव्हती. तसंच स्टारकिड त्यांना जे वाटतं ते घालतात आणि तेच टेस्फुटल असतं.” असं पुढं उर्फीन लिहिलं आहे (Urfi Javed Controversy News).

दरम्यान, उर्फी एवढ्यावर शांत नाही बसली. तिनं आपल्या पुढील फोटोमध्ये चक्क फराह अली खानचा फोटो शेअर केला आहे (Urfi Javed Controversial News). ज्या फोटो मध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. फोटो सोबत तिनं लिहिलं की, ‘मी कोणत्या महिलेला कमीपणा नाही दाखवू इच्छित. परंतु त्यांच्या अशा वागण्याने मला राग येतो. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही घालू शकता आणि पोस्ट सुद्धा करू शकतात. तर टेस्टफुल आहे. परंतु मी जे घालते ते टेस्टफूल नाही?’

 

 

web title : Urfi Javed Controversy News | urfi javed slam farah khan ali for commenting on her clothes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा