चोकसी धोकेबाजच ! न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर भारताकडे सोपवणार, अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अँटिग्वा आणि बर्म्यूडाचे पंतप्रधान गास्टन ब्राऊन यांनी  पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला मोठा धक्का दिला आहे. पंतप्रधानांनी त्याला धोकेबाज म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमेरिकीला आलेल्या गास्टन यांनी म्हटले कि, चोक्सी याच्या घोटाळ्याविषयी योग्य ती माहिती घेतली आहे.

या कार्यक्रमात चोक्सी विषयी बोलताना ते म्हणाले कि, मी या प्रकरणाची माहिती घेतली असून तो एक घोटाळेबाज आहे. सध्या त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकरणात सध्या आम्ही काहीही करू शकत नाही. मात्र आम्ही त्याला आमच्या देशात ठेवू इच्छित नाही.

भारतीय अधिकारी करू शकतात चौकशी

भारतीय अधिकाऱ्यांना त्याची चौकशी करण्याची परवानगी देण्यावर ते म्हणाले कि, मला काहीही अडचण नाही. भारतीय अधिकारी हवे तेव्हा त्याची चौकशी करू शकतात. तो चौकशीस सहकार्य करत असेल तर माझी याबाबत काहीही हरकत नाही. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आमचे सरकार यामध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.

हे माहित असते तर नागरिकता दिली नसती

माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटले कि, त्याच्या घोटाळ्याविषयी माहिती असते तर त्याला देशाची नागरिकता दिली नसती. त्याला भारताकडे सोपवले जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तो आमच्या देशाचे नाव खराब करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले. अँटिग्वामध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था असून त्याचे प्रकरण न्यायालयात आहे.

दरम्यान, मेहुल चोक्सी आणि निरव मोदी हे दोघेजण पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी फरार असून या दोघांनी जवळपास 14 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सरकार या दोघांच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न करत आहे.

Visit : policenama.com