काय सांगता ! होय, जगभरातील ‘या’ मुख्य ठिकाणी तैनात आहे अमेरिकन नौदलाचे ‘आरमार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे नौदल इतर देशांच्या तुलनेत बलाढ्य आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे सैन्यदल जगात सर्वात प्रभावी आहे. अमेरिकेचे जगात वर्चस्व राखण्यात है नौदल महत्त्वाची भूमिका बजावत असतं. पूर्ण जगाचा जरी विचार केला तरी जगभरातील अनेक महत्त्वाच्या भागात अमेरिकेन नौदलाचे आरमार तैनात असते.

1) दुसरे आरमार – उत्तर अटलांटिक महासागरात अमेरिकन नौदलाचे दुसरे आरमार तैनात आहे.

2) तिसरे आरमार – पॅसिपिक महासागरात अमेरिकन नौदलाचे तिसरे आरमार तैनात आहे. सॅन डियागो येथे त्याचे मुख्यालय आहे.

3) चौथे आरमार – दक्षिण अटलांटिक महासागरात अमेरिकेचे चौथे आरमार तैनात आहे. याचे मुख्यालय मेपो, फ्लोरिडा येथे आहे.

4) पाचवे आरमार – अमेरिकन नौदलाचे पाचवे आरमार हे मध्य पूर्वेत तैनात आहे. या आरमाराचे मुख्यालय बहरीनमधील मनामात आहे.

5) सहावे आरमार – अमेरिकेचे सहावे आरमार इटलीतील गाएटात तैनात करण्यात आले आहे. भूमध्य समुद्रात रशियन नौदलाचा होणार हस्तक्षेप रोखणं हा या आरमाराला तैनात करण्याचा हेतू आहे.

6) सातवे आरमार – अमेरिकन नौदलाचे सातवे आरमार पश्चिम पॅसिफिक महासागरात तैनात आहे. योकोशुमा येथे या आरामाराचे मुख्यालय आहे.

7) दहावे आरमार/सायबर कमांड – अमेरिकेचे दहावे आरमार अमेरिकेतील मध्य अटलांटीक किनाऱ्यावर तैनात आहे. या आरमाराला सायबर कमांड म्हणतात. आधुनिक काळातील सायबर वॉरचा सामना करणं हे या कमांडचं काम आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/