PM मोदींचे ‘भक्‍त’ झाले डोनाल्ड ट्रम्प, भाषण ऐकण्यासाठी UN मध्ये अचानक पोहचले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात ‘जलवायू परिवर्तन’ शी संबंधित एका सत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले.यावेळी अचानकपणे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन झाले. ट्रम्प हे या कार्यक्रमासाठी अचानकपणे उपस्थित राहिल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

ट्रम्प हे तब्बल १५ मिनिटांसाठी कार्यक्रमामध्ये उपस्थित होते यावेळी त्यांनी कोणतेही भाषण केले नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल यांचे भाषण ऐकले. त्यानंतर ट्रम्प यूएन मुख्यालयाकडे रवाना झाले.

रविवारी ट्रम्प आणि मोदी एकाच व्यासपीठावर ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमासाठी जमले होते. यावेळी ट्रम्प यांनी अर्धा तास भाषण केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संपूर्ण भाषण ऐकले सुद्धा.

नेमकं काय म्हणाले होती पंतप्रधान मोदी या वेळी

जलवायु परिवर्तन कार्यक्रमात संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आता बोलण्याची वेळ संपून गेली आहे. आता जगाला करून दाखवायचे आहे. आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी पाऊल उचलले आहे. आम्ही प्लास्टिक विरोधात बंदी आणली आहे.

पंतप्रधान यावेळी म्हणाले आपण या गोष्टीचा स्वीकार करायला हवा की आपल्याला मोठं मोठ्या संकटाना सामोरे जायचे असेल तर आपण जे करत आहोत ते खूप कमी आहे. भारत आज फक्त या गंभीर मुद्द्यावर बोलण्यासाठी नाही तर याबाबतचा एक रोड मॅप प्रस्तुत करण्यासाठी उभा आहे.

Visit : policenama.com