अमेरिका राष्ट्रपती निवडणुक : जो बायडन यांचा मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न, ट्रम्प यांच्यावर मात करण्यासाठी मदत करण्याचं केलं आवाहन

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणार्‍या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीचे संभाव्य उमेदवार जो बायडन यांनी मुस्लिम अमेरिकन नागरिकांना देशाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मात देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आयोजित एका ऑनलाइन शिखर संमेलनात त्यांनी हे आवाहन केले. बायडन म्हणाले, मी तुमचे मत केवळ यासाठी मागत नाही की, ते (ट्रम्प) राष्ट्राध्यक्ष बनण्यास लायक नाहीत, तर मी तुमच्या सोबत मिळून काम करण्यास इच्छूक आहे आणि तुमचा आवाज निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी करायचा आहे, कारण आपण देशाच्या पुननिर्माणासाठी आपण काम करत आहोत.

बायडन यांनी ट्रम्प प्रशासनाने मुस्लिम देशांच्या प्रवाशांवर लावलेला प्रतिबंध द्वेषपूर्ण असल्याचे म्हणत तो बदलण्याची पुन्हा उच्चार केला. बायडन यांनी म्हटले की, मुस्लिम अमेरिकनांच्या गोष्टी आपला समाज आणि देशासाठी महत्वपूर्ण आहेत. आपण सर्व जाणतो की, तुमच्या आवाजाला कधी ओळख मिळू दिली नाही आणि त्यास प्रतिनिधित्व दिले गेले नाही.