Coronavirus : इलेक्शन फंड जमा करण्यात बिडेन यांनी ट्रम्प यांना दिली जबरदस्त ‘टक्कर’, एप्रिलमध्ये जमवले 6-6 कोटी डॉलर

वॉशिंग्टन – कोरोना महामारी सुरू असतानाच अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीचे पडघमही तिथे वाजू लागले आहेत. दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्षपद भूषवण्यास उत्सुक असलेल्या ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात निवडणूक निधी गोळा करण्यात बाजी मारली आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी माजी उपाध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन यांनीही त्यांना जबरदस्त टक्कर दिली आहे. एप्रिल महिन्यात ट्रम्प यांनी 6.17 तर बिडेन यांनी 6.05 कोटी अमेरिकी डॉलरचा निधी गोळा केला आहे. कोरोना महामारीमुळे अमेरिकेतील 3.3 कोटी नागरिकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. तीन नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, दोन्ही उमेदवार व्हर्च्युअल माध्यमांतून निधी गोळा करत आहेत.