उत्तर प्रदेशात क्रौर्याचा कळस ! अल्पवयीन मुलीचे डोके वीटेने ठेचले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – उत्तर प्रदेशा (Uttar Pradesh) तल्या भदोही जिल्ह्यातल्या एका गावात दलित मुलीची हत्या करण्यात आली. मुलीचे डोके विटेने ठेचण्यात आले आहे. दुपारच्या वेळेस आराम करण्यासाठी मुलगी शेतात गेली होती. त्यावेळी तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पोलिसांनी दलित समाजातील दोघांना अटक केली आहे.

दोन कुटुंबात असलेल्या कलहामुळे या मुलीची हत्या करण्या आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या धक्कादायक घटनेत हत्या झालेल्या मुलीवर बलात्कार झाला होता की नाही हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. मात्र मृत मुलीच्या कुटुंबीयांनी बलात्कार झाल्याचा कोणताही आरोप अद्याप केलेला नाही. ग्यानपूरचे पोलीस अधिकारी भूषण वर्मा म्हणाले की, या मुलीचा मृतदेह आम्हाला शेतात आढळून आला. ही मुलगी शेतात गेली होती. मात्र तिथून ती परतली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबायांनी तिची शोधाशोध सुरु केली. मात्र या मुलीच्या कुटुंबीयांना तिचा मृतदेह शेतात दिसून आला. मुलीला ठार करणारे आरोपी हे दलित समाजाचे आहेत. मुलीची हत्या करणार्‍या मुलांच्या कुटूंबियांनी मुलीच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या होत्या.