CAA : हिंसाचार करणार्‍यांवर योगी सरकारची मोठी कारवाई, PFI चे 25 जण अटकेत

ADV

लखनऊ : वृत्तसंस्था – सीएएला विरोध करण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला उत्तर प्रदेशातील विविध भागात हिंसकवळण लागले. याप्रकरणी योगी सरकारने मोठी करवाई केली असून पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या 25 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर राज्यात विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात सहभागी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ADV

उत्तर प्रदेशात नागरिकत्व सुधारणा कायदाच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये पिएफआय संघटनेचे नाव पुढे आले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात राज्यात झालेल्या हिंसाचारात पीएफआयचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. उत्तर प्रदेश सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाला पाठवला आहे. याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अहवाल मागवण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेश गृहमंत्रालयाने पीएफआयवर बंदी घालण्याचा मसुदा तयार केला आहे. राज्यातील हिंसाचाराच्या अनेक घटनांमध्ये पीएफआयच्य नेत्यांच्या विरोधात पुरावे आढळले आहेत. दरम्यान सीएएच्या विरोधात केलेल्या आंदोलनात पीएफआयचे सदस्य आणि दहशतवादी संघटना सिमी सोबत संबंध असल्याची शक्यता असून याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी गृह मंत्रालयाला देण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/