CA पदासाठी मोठी भरती, ‘असा’ करा अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने नॅशनल फायनान्स रीपोर्टींग ( एनएफआरए ) मध्ये १० पदांवर  भरतीकरिता आधीसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.  त्यामुळे CA बनू  इच्छिणाऱ्या  तरूणांकरिता मोठी संधी उपलब्ध होणार आहे. एनएफआरए  ने आधीसूचनेत प्रसिद्ध केलेल्या १० पदांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट, काॅस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी या पदांचा समावेश आहे.

ही पदे  कंत्राटी पध्द्तीने भरली जाणार असून  याकरिता अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ मे २०१९ आहे. हा अर्ज पोस्टाद्वारे  पाठवू शकाल. पदांची संख्या एकूण १० आहे. याकरिता अर्ज करणारा मान्यताप्राप्त संस्थेमधून चार्टर्ड अकाउंटंट, काॅस्ट अकाउंट, कंपनी सेक्रेटरी या परीक्षा उत्तीर्ण झालेला असला पाहिजे. संबंधित क्षेत्रात त्याला कमीत कमी २ वर्षांचा अनुभव हवा. याकरिता वयाचीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या पदांकरिता  ४० हजार रुपये वेतन असेल.  या पदांकरिता विनामूलय अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवाराची निवड मुलखतीच्या आधारे केली जाणार आहे.

कसा कराल अर्ज ?

–उमेदवारांनी www.mca.gov.in वर लाॅग इन करा. होमपेज उघडल्यावर नोटिस अँड सर्कुलर्सवर जा. नंतर Engagement Of NAFRA Dated (77 KB) लिंकवर क्लिक करा.

–लिंकवर क्लिक केल्यावर संबंधित जाहिरात उघडेल. अर्ज करण्याआधी ते काळजीपूर्वक वाचा. जाहिरातीला अर्ज जोडून ए4 साइजचं प्रिंट आऊट काढा.

–त्यानंतर ते सर्व खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

–पोस्टानं अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – २७ मे २०१९

या पत्त्यावर पाठवा अर्ज

सेक्रेटरी, नॅशनल, फायनॅन्शियल रिपोर्टिंग अथाॅरिटी, एचटी हाऊस, 18-20 के.जी.मार्ग, नवी दिल्ली – 110001

अधिक माहितीसाठी  www.mca.gov.in वर लाॅग इन करा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like