भाजी मार्केटचा उपसचिव २५ हजार रुपयांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

वाशी येथील मार्केटमध्ये येणाऱ्या वाहनांवर लेव्ही न लावण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भाजी मार्केटच्या उपसचिवाला सापळा रचून रंगेहाथ पकडले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff15d348-cde7-11e8-83dd-9d04c8806d7b’]

नामदेव गोपीचंद जाधव (वय ५२, रा. एपीएमसी, भाजीपाला मार्केट) असे त्यांचे नाव आहे. नवी मुंबईतील सर्वात मोठ्या भाजी मार्केटमध्ये राज्यातील तसेच परराज्यातील भाजीपाला विक्रीसाठी येतो. तसेच येथून देशभर माल पाठविला जातो. या ठिकाणी भाजीपाला घेऊन येणाऱ्या सर्व वाहनांना मार्केट टॅक्स द्यावा लागतो. त्याच्यावर लेव्ही लावण्यात येते. ही लेव्ही लावून नये, यासाठी काही वाहनचालकांनी नामदेव जाधव यांना विनंती केली होती. त्याबदल्यात जाधव यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्याची तक्रार एका ४७ वर्षाच्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची गुरुवारी पडताळणी केली. त्यात जाधव यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तडजोडीत त्यांनी २५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. तक्रारदाराकडून गुरुवारी दुपारी साडेचार वाजता २५ हजार रुपये स्वीकारताना जाधव यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

[amazon_link asins=’B07GVD5H1N’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’323830d4-cde8-11e8-b307-310727f1c3df’]

प्रॉपर्टी कार्डावर नावाची नोंद करुन कार्डाची नक्कल देण्यासाठी ४ हजार रुपयांची लाच घेताना रोहा येथील भूमि अभिलेख कार्यालयातील निमतानदार यांना सापळा रचून पकडण्यात आले. बाळासाहेब सखाराम माळी (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी एका ५२ वर्षाच्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे असलेल्या नागोठणे सिटी सर्व्हे नंबर ७९९ व ८०० चे मिळकतीचे प्रॉपर्टी कार्डवर तक्रारदार यांच्या नावाची नोंद करायची होती़ व प्रॉपर्टी कार्डची नक्कल देण्यासाठी माळी यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती त्यांनी ४ हजार रुपये घेण्यास मान्यता दिली. रोहा येथील अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माळी यांना पकडण्यात आले.

रात्री ११ वाजता ७ लाखाची मागणी करून १ लाखाची लाच घेणारे दोघे अँटी करप्शनच्या जाळ्यात