वास्तु शास्त्र : ‘या’ गॅझेट्सची चुकूनही करू नका ‘आदला-बदल’, जाणून घ्या ‘दुष्परिणाम’

पोलीसनामा ऑनलाइन – गॅझेट्स शिवाय अनेकांना जीवन अर्धवट वाटते. सध्याच्या जीवनशैलीचा विचार करता अनेकजण सर्वात जास्त गॅझेट्सचा वापर करतात. घर ते ऑफिस सर्वत्र गॅझेट्स सोबत असतात. या गॅझेट्सशिवाय काम करण्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही. कारण अधुनिक युगात वेळेची किंमत वाढत चालली आहे.

परंतु, आपल्याला हे नंतर समजते की, ही गॅझेट्स आपल्या नशिबाशी जोडलेली असतात. होय, ज्या गॅझेट्सचा जास्त काळ वापर केला जातो, त्या गॅझेट्समध्ये तुमची निगेटीव्ह उर्जा सामावलेली असते. यासाठी वास्तु शास्त्रानुसार या गॅझेट्सची आपसात कोणतीही देवाण-घेवाण करू नये.

मोबाईल कुणालाही देऊ नका
मोबाईल जुना झाल्यानंतर अनेकदा लोक तो विकतात किंवा कुणाला तरी देऊन टाकातात. असे करू नये. कारण मोबाईल एक असे गॅझेट आहे, ज्याचा सर्वात जास्त वेळ उपयोग केला जातो. यासाठी जर तुम्ही हा कुणाला दिला किंवा कुणाकडून घेतला तर यातून नकारात्मक उर्जेचे आदान-प्रदान होते, ज्या व्यक्तीला मानसिक तणाव आणि अन्य प्रकारच्या समस्या असतात.

घड्याळ एकमेकांना देऊ-घेऊ नका

घड्याळसुद्धा सतत व्यक्तीच्या शरीराला जोडलेले असते. यासाठी ते सुद्धा महत्वपूर्ण असते. नेहमी घड्याळ जुने झाल्यानंतर ते कुणाला तरी दिले जाते. परंतु, ही इच्छा दाबून टाका. असे केल्याने तुमच्यासाठी नुकसानकारक सुद्धा होऊ शकते. तसेच कुणाचे घड्याळ घेऊ नका आणि कुणाला देऊ नका. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा.

पर्सची देवाण-घेवाण करू नका
पर्सची सुद्धा चुकूनही आदला-बदल करू नका. दुसर्‍याने वापरलेली पर्स घेतल्यास यातून नकारात्मक उर्जा घरात येते. यातून धनहानी आणि एखादी किंमती वस्तू गहाळ होण्याची शक्यता वाढते.

चष्मा सुद्धा कुणाला देऊ नका, घेऊ नका
चष्मा आदला-बदली करू नये. कुणी वापरलेला चष्मा घालणे वास्तू शास्त्रानुसार चुकीचे आहे. यातून दुसर्‍याची नकारात्मक उर्जा येते. यासाठी असे करू नका.