Vastu Tips : ‘क्रिस्टल’ बदलू शकतं तुमचं नशीब, ‘या’ पध्दतीनं करावा वापर, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कलियुगात, सूर्याला प्रत्यक्ष देवता मानले जाते. वास्तुचे काही नियम सूर्याच्या किरणांवर आधारित आहेत. जर एखादे ठिकाण उर्जाहीन असेल तर ते सूर्याच्या किरणांनी ऊर्जावान बनवले जाऊ शकते. या सूर्याच्या किरणांना नियंत्रित मात्रामध्ये क्रिस्टल आपल्यापर्यंत पोहचवते. क्रिस्टल वास्तुमध्ये खूप महत्वाचा आहे. दिसायला चमकदार आणि फारच आकर्षक दिसणाऱ्या क्रिस्टलमुळे आयुष्यात बर्‍याच सुधारणा केल्या जाऊ शकतात.

जर तुमच्या इच्छेनुसार, तुम्ही क्रिस्टल ठेवू इच्छित असाल तर आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहे त्या मिळणार नाही. वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी, क्रिस्टल वेगळ्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. चला तर मग क्रिस्टल्सच्या वास्तु कनेक्शनबद्दल जाणून घेऊया….

– कोणताही क्रिस्टल बॉल लावण्यापूर्वी सूर्याच्या किरणांनी याला अॅक्टिव्ह बनवा.
– जर तुमच्या घरात वारंवार भांडण होत असतील तर तुम्ही तुमच्या घराच्या खोलीत क्रिस्टल बॉल्स अशा प्रकारे लावाले की, सूर्याच्या किरण त्यावर पडून ते आपल्या घरात आत यावे आणि जर सूर्यप्रकाश नसेल तर काही काळ ते सूर्यप्रकाशात अॅक्टिव्ह करा आणि नंतर त्या जागेवर ठेवा.
– जर व्यवसायात सतत तोटा होत असेल तर कार्यालय किंवा कारखान्याच्या वायव्य दिशेने रंगीत क्रिस्टल बॉल ठेवा.
– जर तुमचे तुमच्या जोडीदरासोबत सारखे वाद होत असतील तर दररोज बेडरूममध्ये क्वार्ट्जचा क्रिस्टल बॉल ठेवा, परंतु हे लक्षात ठेवा की, हा क्रिस्टल बॉल दिवसातून तीन वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवावा.
-ज्या पालकांना आपल्या मुलांचे लक्ष शिक्षणाकडे वळवायचे असेल तर त्यांनी त्यांच्या स्टडी रुममध्ये क्रिस्टल बॉल लावला पाहिजे. हा क्रिस्टल बॉल घराच्या ईशान्य दिशेने लटकलेला असावा.
-क्रिस्टल घराच्या पूर्व दिशेने ठेवला पाहिजे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा कमी येते आणि घरात आनंद येतो.
-क्रिस्टल ग्लोबचा वापर करण्यापूर्वी मीठाच्या द्रावणात ते 24 तास ठेवावे, नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवावे आणि एका काचेच्या भांड्यात ठेवावे आणि सकाळच्या उन्हात दोन ते तीन तास वाळवावे. असे केल्याने, क्रिस्टल ग्लोब अधिक प्रभावी बनतो. या ग्लोबला दिवसातून तीन वेळा फिरवले पाहिजे जेणेकरून त्यातून निघणारी यांग उर्जा संपूर्ण क्षेत्रात पसरेल.