Vastu Tips : योग्य रंगाच्या झाडामुळे होईल भरभराट, अशी वाढेल घरातील समृद्धी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वास्तुच्या दृष्टीने घरातील ऊर्जा चांगली राहिल्यास घरातील सर्व व्यक्तीचे आरोग्य सुद्धा चांगले राहते आणि धन व्यवस्थित राहते. पैशाची कमतरता माणसाच्या जीवनात अडथळे निर्माण करते. अशावेळी घरात लावलेल्या शोभेच्या झाडांचे वेगळेच महत्व असते. घरात जांभळ्या रंगाची झाले शुभ मानली जातात, ही पैसा घेऊन येतात. हे रोपटे आर्थिक संपूर्णतेचे प्रतीक असते.

ज्या घरात जांभळ्या रंगाची फुले देणारे रोपटे असते, ते खुप शुभ मानले जाते. परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, घराच्या उत्तर पूर्व दिशेला खुप मोठे रोप लावू नये. तुम्ही रोपटे लावू शकत नसाल तर पर्पल म्हणजेच जांभळ्या रंगाच्या रोपाचे छायाचित्र सुद्धा लावू शकता.

काही रोपे घराची सकारात्मक उर्जा वाढवतात, जसे की बांबूचे रोप, कमळाचे फुल किंवा तुळशीचे रोप. हे घराचे भाग्य वाढवतात. मनी प्लांट सुद्धा घरात लावणे शुभ मानले जाते. हा वेल घराच्या दक्षिण पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला बैठकीच्या खोलीत लावणे शुभ मानले जाते.

जर तुम्ही घरात फुलांची चांगली अरेजमेंट किंवा बुके ठेवत असाल तर ते सुद्धा शुभ मानले जाते. यामध्ये विविध रंगाची फुले आणखी चांगले मानले जाते. उत्तर पूर्व दिशेला बुके ठेवायचा असेल तर निळ्या रंगाचा ठेवा. तर घराच्या दक्षिण पश्चिम देशाला फुलदानी ठेवायची असेल तर केवळ पिवळ्या रंगाची ठेवा.