Ved Box Office Collection | ‘पठाण’च्या धमाक्यात ‘वेड’ची जादू कायम; चौथ्या आठ्वड्यात केली एवढ्या रुपयांची कमाई

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Ved Box Office Collection | सध्या बॉलीवूडचा किंग शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचा मराठी सिनेमावर काहीच परिणाम झाला नाही अर्थात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामुळे अभिनेता रितेश देशमुखच्या वेड या चित्रपटाचे काय झाले हा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला आहे. तर आज आपण जाणून घेऊया वेड चित्रपटाने आजपर्यंत किती कमाई केली आहे. (Ved Box Office Collection)
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या वेड या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून चालू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता रितेश देशमुखने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तर तब्बल दहा वर्षांनी अभिनेत्री जेनेलिया मोठ्या पडद्यावर झळकत आहे. त्यातच जेनेलियाचा हा पहिलाच मराठी सिनेमा असल्याने सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होत होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांना चित्रपटाने वेड लावले होते. वेड चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार करत रेकॉर्ड स्थापित केले आहे. या चित्रपटाची चर्चा प्रदर्शित झाल्यापासून सर्वत्र दिसून येत होती.
आताही पठाणच्या दबदब्यातदेखील हा सिनेमा स्थिर उभा असल्याचे दिसत आहे.
पठाण चित्रपटामुळे वेड या चित्रपटावर फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही.
वेड चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 6.11 कोटींची कमाई केली आहे.
आतपर्यंत चित्रपटाने आतापर्यंत तब्बल 57.15 कोटींचा गल्ला जमवला आहे.
Web Title :- Ved Box Office Collection | ved box office collection riteish deshmukh genelia movie not affect from pathaan see
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण