Video : तुुम्ही देखील भाज्या या पद्धतीनं करू शकता सॅनिटाइझ, पुन्हा-पुन्हा पाहिला गेला व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाइन:‘ जिथं कमी तिथं आम्ही’ या वाक्यप्रमाणेच भारतीय लोक कोणत्याही अडचणींवर देशी उपाय करत असतात. अशाच एका अवलियाचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या कोरोनाचा प्रसार वाढत असताना फळं आणि पालेभाज्या सॅनिटाइझ करून खावी लागत आहेत. बरेच जण पालेभाज्या आणल्यावर त्या गरम पाण्याने धुऊन वापरत आहेत. पण या व्यक्तीने पालेभाज्या सॅनिटाइझ करण्याची एक नवीन शक्कल शोधली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयएएस आधिकारी सुप्रिया साहू यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती पालेभाज्या कूकरची शिट्टी काढून तिथे पाइप टाकून त्या पाईपमधून येणाऱ्या वाफेवर सॅनिटाइझ करताना दिसत आहे. या व्यक्तीचा हा जुगाड चांगलाच भावला आहे, असं दिसतंय.

सुप्रिया साहू यांनी या व्हिडिओच्या खाली लिहलं आहे की, पालेभाज्या सॅनिटाइझ करण्याचा हा भारतीय जुगाड खूप मस्त आहे. याचा परिणाम किती होईल हे माहीत नाही पण अशा गोष्टी नेहमी चकित करत आल्यात.

व्हिडिओमधील व्यक्ती म्हणताना दिसतोय की, पालेभाज्या गरम पाण्याने धुतल्यावर खराब होतात. त्यापेक्षा अशा पद्धतीने वाफेवर पालेभाज्या स्वच्छ कराव्यात.