साईनाथनगरमध्ये टोळक्याची धुडगूस, वाहनांची तोडफोड, दगडफेक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथनगर येथे टोळक्याने अक्षरशः धुडगूस घातला आहे. दिवसाढवळ्या टोळक्याने धारदार हत्यारांनी रस्त्यांवर पार्क केलेल्या अनेक वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली आहे. तसेच परिसरातील दुकानांवर दगडफेक केली असल्याचे समजत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

निगडीतील, साईनाथनगर परिसरात दुपारी सव्वा दोनच्या सुमारास १५ ते २० जणांचे टोळके आले. त्यांच्याकडे धारदार हत्यारे होती. टोळक्याने अचानक रस्त्यांवरील वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. वॅगनर, झायलो, स्कॉर्पिओ, फॉर्च्युनअर, दुचाकी यासह आठ ते नऊ गाड्यांची तोडफोड केली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d224d20-bd87-11e8-a83b-d1278d6d2495′]

दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होऊन वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वीच वाहनांची तोडफोड झालेली आहे. यातील सर्व आरोपीही अद्याप अटक झाले नाहीत, ही घटना ताजी असतानाच आज घडलेल्या तोडफोडीमुळे भिती निर्माण झाली आहे.

वाघाचा शूटर नवाब जंगलाबाहेर