लोकशाहीची गळचेपी होतेय असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे : विक्रम गोखले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अंतीम चौथ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. राज्यातील १७ जागांसह देशभरात ९ राज्यातील ७१ जागांसाठी आज मतदान होत आहे. राजकिय नेत्यांसह अनेक सिने तारकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. गळचेपी होतेय असे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे असे विक्रम गोखले म्हणाले.

अनेकजण आपल्या देशात लोकशाही धोक्यात असल्याचे म्हणत आहेत. लोकशाही धोक्यात असल्याचे सांगून ते लोकांची दिशाभूल करणाऱ्या लोकांना विक्रम गोखले यांनी चपराक लागावली. देशाची लोकशाही धोक्यात असल्याचे म्हणणारे कोण आहेत ? अशा लोकांना माझ्या समोर आणून उभे करा. त्यांचे कानफाड फोडले पाहिजे असे विक्रम गोखले यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.

राज्यात होत असलेल्या मतदानाला मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. उन्हाचा पारा चढला असताना देखील मतदारांनी मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्यातील अनेक मतदारसंघाच्या बाहेर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे दिसून येत आहे. तर नवीन मतदार आपला पहिला मतदानाचा अधिकार बजावून मतदान केल्याचा सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकत आहेत. तसेच ज्यांनी मतदान केले नाही त्यांना आम्ही मतदान केले तुम्ही केले का ? असा सवाल करत मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.