प्रकृती खालवल्यामुळे लता मंगेशकर ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारताची कोकीळा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयाचे वरिष्ठ आरोग्य सल्लागार Dr. Farokh E Udwadia आणि डॉ. प्रतित समधानी हे लता मंगेशकर यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. लतादीदी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सध्या लता मंगेशकर या रुग्णालयात आहे. त्याचरोबर त्यांचे कुटुंब देखील रुग्णालयात असल्याची माहिती मिळाली आहे.

Visit : Policenama.com