Vi भारतातील सर्वात ‘वेगवान’ मोबाईल नेटवर्क, दुसऱ्या क्रमांकावर Airtel तर तिसऱ्या क्रमांकावर Jio

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   इंडियन लीडिंग टेलिकॉम Vi (Vodafone Idea) हे भारतातील सर्वात वेगवान नेटवर्क म्हणून उदयास आले आहे. 2020 च्या तिसर्‍या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली गेली आहे. नेटवर्क अ‍ॅनालिस्ट आणि स्पीड टेस्ट फर्म Ookla च्या मते व्हीआय (Vi) चा सरासरी डाऊनलोडिंग स्पीड 13.47Mbps राहिला, तर अपलोडचा सरासरी स्पीड 6.19 Mbps राहिला.

Vi (Vodafone Idea) नंतर वेगवान नेटवर्कच्या बाबतीत एअरटेल (Airtel) दुसर्‍या क्रमांकावर आहे. या कंपनीचा सरासरी डाऊनलोड स्पीड 13.58Mbps राहिला आहे, तर त्याचा सरासरी अपलोड स्पीड 4.15Mbps राहिला आहे. फास्टेस्ट नेटवर्कच्या बाबतीत रिलायन्स जिओ (Reliance Jio) तिसर्‍या क्रमांकावर आहे. रिलायन्स जिओचा सरासरी डाऊनलोड स्पीड 9.71Mbps राहिला, तर थर्ड क्वॉर्टरमध्ये सरासरी अपलोडचा स्पीड 3.41Mbps राहिला.

मोबाइल डाऊनलोड स्पीडविषयी बघितले तर शहरांच्या दृष्टीने ते वेगवेगळे आहे. उदाहरणार्थ, मुंबई शहरातील सरासरी डाऊनलोड स्पीड तिसर्‍या तिमाहीत दुसऱ्या क्रमांकावर होता. दिल्ली 13.04Mbps मोबाइल डाऊनलोड स्पीडच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे.

जिओ (Jio) ने उपलब्धतेच्या बाबतीत मारली बाजी

भारतात 4G उपलब्धतेच्या बाबतीत रिलायन्स जिओ 99.7 टक्के 4G उपलब्धतेसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर एअरटेल 98.7% सह दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिसरा क्रमांक व्हीआयचा आहे, ज्याची 4G उपलब्धता 91.1% आहे.

मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत भारत मागे

Ookla ने अलीकडेच मोबाइल डेटा स्पीडची यादी प्रसिद्ध केली होती. या यादीमध्ये भारत 131 व्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये एकूण 138 देश आहेत. गेल्या काही महिन्यांत भारत दोन ते तीन स्थानांनी खाली आला आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका सारखे भारताचे शेजारी देश स्पीडच्या बाबतीत भारतापेक्षा वरचढ आहेत.