Coronavirus : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ‘कोरोना’ पॉझिटिव्ह !

वृत्तसंस्था – भारताचे उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज सकाळी त्यांनी कोरोना चाचणी केली होती. आता त्याचा अहवाल सकारात्मक आला आहे.

उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या उषा नायडू यांनी स्वतःला आयसोलेट केलं आहे. उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी त्यांची प्रकृती बरी आणि उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी गृह मंत्री अमित शहा यांना कोरोना झाला होता. काही दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर शहा यांनी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्यानंतर त्यांना घरी जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली होती.