Vicky Kaushal | विकी कौशलने करिअरबद्दल केला मोठा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Vicky Kaushal | अभिनेता विकी कौशल सध्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विकीने आपल्या अभिनयाच्या जोरावर आजवर अनेकांची मनं जिंकली आहेत. बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये त्याचेही नाव घेतले जाते. सध्या विकी कौशल त्याच्या आगामी चित्रपट गोविंदा नाम मेरा याचा प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याने मराठीतील लोकप्रिय कॉमेडी शो चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावली होती. त्यामध्ये त्यांनी त्याच्या आयुष्यातील अनेक संघर्षमय दिवसांवर भाष्य केले आहे. (Vicky Kaushal)

 

यावेळी विकीने त्याच्या जीवनातील संघर्षमय दिवसांची आठवण करत म्हणाला, “सुरुवातीला मला कोणीही काम देत नसत. मला कास्ट केले जात नव्हते. मी ऑडिशन देऊन घरी यायचो त्यावेळी खूप उदास असायचो. कारण काही मला समजत नव्हते. कशामुळे मला डावलले जाते याचा मी विचार करायचो. घरी आल्यावर मला उदास पाहून आई म्हणायची की तू हा विचार करू नकोस ,की तुझ्याबरोबर हे सर्व काही कशासाठी होते तू फक्त तुझ्या कामावर लक्ष ठेव. तिचे हे शब्द ऐकल्यावर माझी चिंता दूर व्हायची. त्यानंतर मी सकारात्मक विचार करायला लागायचो”. (Vicky Kaushal)

विकीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात सहायक दिग्दर्शक म्हणून केले होते, तर अभिनयाला सुरुवात करून त्याने प्रेक्षकांना ‘राझी’, ‘उरी’, ‘सरदार उधम’ यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गोविंदा नाम मेरा या चित्रपटात विकी सोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि कियारा आडवाणी यादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या चित्रपटात विकी एक वेगळीच भूमिका साकारणार आहे.

 

Web Title :- Vicky Kaushal | bollywood actor vicky kaushal people were not ready to give me work

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | वैद्यकीय विद्यार्थ्याला लुटल्यानंतर नग्न व्हिडिओ काढणाऱ्या 3 जणांना अटक

Karnataka Rakshana Vedike – Sanjay Raut | कन्नड रक्षण वेदिकेने दिली संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, धमकीचे 2 फोन

Pimpri Chinchwad Bandh | महाराष्ट्रातील महापुरुषांच्या बदनामी विरोधात गुरुवारी पिंपरी-चिंचवड बंद, छत्रपती संभाजीराजे होणार सहभागी

Pune PMC News – Parvati Hill | ‘पर्वती हिलटॉप हिलस्लोपवरील जागा रहिवासी करून मूळ मालकाला देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नको’ – सर्वोच्च न्यायालय