विकी कौशलचा ‘भूत’ ऑनलाईन लीक, ‘अशी’ करतात HD प्रिंट डाऊनलोड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार विकी कौशलचा भूत द हॉन्टेड शिप हा सिनेमा कालच (शुक्रवार दि 21 फेब्रुवारी 2020) थिएटरमध्ये रिलीज झाला. ट्रेड एक्सपर्ट्सच्या मते सिनेमा लोकांना घाबरवण्यात यशस्वी झाला आहे. काही लोक सिनेमाची स्तुती करत आहेत तर अनेकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हा सिनेमा वाटला नाही असं दिसत आहे. या सिनेमापेक्षा आयुष्मान खुरानाचा शुभमंगल ज्यादा सावधान जास्त अटेंशन घेताना दिसत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार भूत सिनेमाच्या रिलीजनंतर आता दुसऱ्याच दिवशी हा सिनेमा तमिळ रॉकर्स या वेबसाईटनं ऑनलाईन लीक केला आहे. सिनेमा लीक झाल्यानं कदाचित निर्मात्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागण्याची श्क्यता आहे. तमिळ रॉकर्सवरून अगदी सहज एका लिंकचा वापर करून कोणत्याही सिनेमाची एचडी प्रिंट डाऊनलोड केली जाऊ शकते.

तमिळ रॉकर्सनं सिनेमा ऑनलईन लीक करण्याची ही का ही पहिलीच वेळ नाही. या वेबसाईटनं याआधीही अनेक सिनेमे ऑनलाईन लीक केले आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणचा छपाक सिनेमाही ऑनलाईन लीक झाला होता. यामुळे दीपिका टेन्शनमध्ये आली होती. इतकेच नाही तर अजय देगवणचा तान्हाजी : द अनसंग वॉरियर हा सिनेमाही ऑनलाईन लीक करण्यात आला होता.

याआधीही या वेबसाईटनं दबंग 3, पती पत्नी और वो, मरजावाँ, ड्रीमगर्ल, भारत, कबीर सिंह, केसरी असे अनेक सिनेमे पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक केले आहेत. यामुळे सिनेमांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता विकीच्या भूत सिनेमावरही याचा परिणाम होण्याचा अंदाज आहे.

भान प्रताप सिंगनं डायेरक्ट कलेल्या या सिनेमात विकी कौशल, भूमी पेडणेकर, आशुतोष राणा असे कलाकार पहायला मिळतात. करण जोहर, अपूर्वा मेहता आणि शशांक खेताना यांनी हा सिनेमा प्रोड्युस केला आहे.