स्टॉल हटवण्यासाठी पोहचले अधिकारी तर ‘र्फड’ इंग्रजी बोलू लागली भाजीवाली, कर्मचारी ‘मुग’ गिळून गप्प (व्हिडीओ)

इंदौर : पोलीसनामा ऑनलाइन –  सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला फाडफाड इंग्लिश बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ तसा साधारण दिसत असला तरी याची माहिती घेतली तर तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. कारण यामध्ये दिसत असलेली महिला एक भाजी विक्रेती आहे आणि तीने पीएचडी केली आहे.

सोशल मीडिया साईट ट्विटरवर हा व्हिडिओ आदिल खान यांनी शेयर केला आहे. त्यांनी व्हिडिओला कॅपशन दिले आहे, वा! इंदौरची भाजी विक्रेती राईसा अंन्सारीने ÷अस्खलित इंग्रजीमध्ये आयएमसीच्या ’लेफ्ट-राईट’ दुकाने उघडण्याच्या योजनेला विरोध केला आहे. तिने 2011 मध्ये पीएचडी केल्याचा दावा केला आहे.

इंदौर महापालिकेने भाजी विक्रेत्यांना एका ठिकाणी जमण्यास मनाई केली आहे. बुधवारी महापालिकेवाले मावला येथील भाजी मार्केटमध्ये कारवाई करण्यासाठी पोहचले असता त्यांना या महिलेने जबरदस्त पद्धतीने विरोध केला आणि ती अधिकार्‍यांच्या समोर इंग्रजीत आपला विरोध व्यक्त करू लागली. भाजी विक्रेतीला अस्खलित इंग्रजी बोलताना पाहून अधिकार्‍यांची झोपच उडाली.

या महिलेचे नाव रईसा अंसारी आहे. हैराण करणारी बाब म्हणजे रईसाने पीएचडी सुद्धा केली आहे आणि त्यानंतरही ती भाजीचा स्टॉल लावते.

रईसाचे म्हणणे आहे की, तिचे कुटुंब सुमारे 60 वर्षांपासून मालवा भाजी मार्केटमध्ये भाजी विकण्याचे काम करते. महापालिका प्रशासनाने जर आम्हाला हटवले तर आम्ही कुठे जाणार, आमच्या कुटुंबासमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पीएचडी करूनही भाजी का विकता, असे विचारले असता रईसा यांनी सांगितले की, पीएचडीच्या नंतर नोकरी मिळाली नाही यासाठी ठरवले की, भाजी विकूनच घर चालवावे.