Video : पोलिसांनी चक्क ब्लाऊज पकडलं, खासदारांसह इतरांवर लाठीचार्ज अन् धक्काबुक्की

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचे देशभरात पडसाद उमटत आहेत. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्थेवरुन राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, पीडितेच्या कुटंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटूंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना भेटू दिल नाही. त्यांच्यानंतर आज तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना देखील धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन, ममता ठाकूर यांच्यासोबत बाकीचे नेते हाथरस गावात पीडितेच्या कुटंबीयांचे सांत्वन करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना गावाच्या सीमेवर अडवले. तसेच पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची सुद्धा झाली. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी खासदार डेरेक ओ ब्रायन यांना धक्काबुक्की करुन ढकलले. तर महिला पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुषपणे बाहेर काढले

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकूर म्हणाल्या की, “उत्तर प्रदेश महिला पोलिसांनी आमच्यासोबत धक्काबुक्की केली. तेव्हा त्यांनी आमचे ब्लाउज पडकले, आमच्या खासदारांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि जमिनीवर पाडले. पुरुष पोलिसांनी देखील गैरवर्तणूक केली, हा अत्यंत लज्जास्पद प्रकार असल्याचं” त्यांनी म्हटलं.

दरम्यान, काल हाथरस पीडित तरुणीच्या कुटूंबीयांच्या भेटीसाठी निघालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांना नोएडामध्ये उत्तर प्रदेशच्या हद्दीत पोलिसांनी प्रवेश नाकारला. ग्रेटर नोयडा भागात यमुना महामार्गाच्या जवळ काँग्रेस नेत्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या. त्यानंतर राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. या प्रकरणी राहुल गांधी यांच्यासह २०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.