Vidhan Parishad Election 2022 | विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे, रंगत वाढली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vidhan Parishad Election 2022 | राज्यसभेची रणधुमाळी पार पडल्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी राजकीय नेत्यांचे डावपेच सुरू झाले आहेत. या निवडणुकीसाठी भाजपाने (BJP) पक्षाचे पाच आणि अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना उभे केले होते. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेने (Shivsena) प्रत्येक दोन उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली सुरू आहेत. (Vidhan Parishad Election 2022)

 

अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे (Shivajirao Garje) यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे येत्या 20 जूनला होणार्‍या विधान परिषद निवडणुकीसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी म्हटले की, महाविकास आघाडीकडे मते जास्त आहेत. भारतीय जनता पार्टीकडे चार उमेदवार निवडून येतील इतकी मते आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे महाविकास आघाडीच्या वतीने केली जात आहे. तसेच भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेसने त्यांचा उमेदवार मागे घ्यावा मग बिनविरोध निवडणुकीबाबत विचार केला जाईल. (Vidhan Parishad Election 2022)

तत्पूर्वी सदाभाऊ खोत म्हणाले की, भाजपाने 6 उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर आजही आम्ही ठाम आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक होणार आहे. या निवडणुकीत 10 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी विधान परिषदेच्या निवडणुकीत उफाळून येईल.

 

सदाभाऊ खोत यांनी दावा केला की, मोठ्या संख्येने भाजपाकडे मते वळाल्याची दिसतील.
राज्यसभेत जो चमत्कार घडला तोच विधान परिषदेत होईल.
आमदारांना घोडे म्हणणे हा त्यांचा अपमान आहे ज्यांनी त्यांना घोडे म्हणले त्यांना घोडा लागेल.
मला अद्याप कुठलाही निरोप आलेला नाही. काँग्रेसने जागा मागे घ्यावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे.

 

Web Title :- Vidhan Parishad Election 2022 | vidhan parishad election sadabhau khots application withdrawn the legislative council elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Water Supply | गुरुवारी पुण्यातील ‘या’ प्रभागातील पाणीपुरवठा बंद राहणार

 

Skin Care Tips | चेहर्‍याचे डाग आणि डार्क सर्कल दूर करेल ‘हे’ जेल, नितळ आणि चमकदार होईल फेस; जाणून घ्या

 

Crime News | ‘तनिष्क’च्या सेल्सगर्लवर गोळीबार, महिलेचा जागीच मृत्यू; परिसरात प्रचंड खळबळ