विधानसभा 2019 : MIM ची दुसरी यादी जाहीर, सोलापूर आणि इतर ठिकाणी वंचित समोर ‘आव्हान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेत एकत्र लढलेले एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच जागावाटपावरून फूट पडली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी वंचितमधून बाहेर पडण्याची घोषणा करून 11 सप्टेंबर रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर आज (रविवार) चार मतदारसंघांची दुसरी यादी जाहीर केली असून सोलापूरच्या दोन मतदार संघामध्ये उमेदवार घोषित केले आहेत.

एमआयएमने पहिल्या यादीमध्ये पुण्यातील वडगाव शेरी, नांदेड उत्तर आणि मालेगाव मध्य मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा केली होती. तर आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीमध्ये सांगोला, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, पुणे कॅन्टोन्मेट या चार मतदारसंघाचा समावेश आहे. सांगोल्यातून शंकर सरगर, सोलापूर मध्य मधून फारुक शाब्दी, सोलापूर दक्षिणमध्ये सुफिया शेख आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून हिना मोमीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून सन्मानजक वागणूक मिळाली नाही. केवळ आठ जागांची ऑफर दिली, ती मान्य नसल्याने वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत असे इम्तियाज जलिल यांनी जाहीर केले होते. त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी देखील युती तुटली असल्याचा खुलासा केला होता. जलील महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले होते.

Visit :- policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like