१० हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरणचा विद्यूत सहायक अँटी करप्शनच्या जाळ्यात

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – १० हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी महावितरणच्या विद्यूत सहायकाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

राहुल संतोष बेंडाळे (वय २४, विद्युत सहाय्यक,म.रा.वि.वि.कंपनी लि.युनीट-शिंदाड, ता.पाचोरा, रा-त्र्यंबक नगर, पाचोरा,जि.जळगाव) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या शेतात असलेल्या गाईच्या चाऱ्याच्या गोडावून वरून गेलेल्या विद्यूत तारा बाजूने करून देण्यासाठी विद्यूत सहायक संतोष बेंडाळे यांने १० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने अँटी करप्शनकडे याची तक्रार केली. तेव्हा पडताळणी करून पथकाने सापळा रचला. त्यानंतर पथकाने १० हजार रुपयांची लाच घेताना राहूल बेंडाळे याला रंगेहात पकडले.

You might also like