Vijay Deverakonda | विजय देवरकोंडाची ईडीच्या चौकशीला हजेरी; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी

0
111
Vijay Deverakonda | makes of liger and actor vijay deverkonda questioned by enforcement directorate agency in hyderabad today
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vijay Deverakonda | दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार आणि प्रत्येक मुलीचा क्रश मानला जाणारा अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडाचा ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. मात्र, नुकताच त्याचा आलेला ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एवढी खास कामगिरी करू शकला नाही. तरीही प्रेक्षक त्याला प्रेम देतच असतात. आता याच चित्रपटासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. (Vijay Deverakonda)

 

लायगर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. तरीही विजयच्या चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येतच आहे. आता या चित्रपटाच्या संदर्भात ईडीला काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्याने विजय देवरकोंडा हैदराबाद येथील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाला आहे. लायगर या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांना या आधीच ईडीने समन्स बजावले होते. तरी या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना बोलावण्यात आले होते. ईडीला असा संशय आहे की, या चित्रपटात बेकायदेशीर गुंतवणूक केली गेली आहे. आता ईडी या चित्रपटासंदर्भातील इतर चौकशी करत आहे. या संदर्भातली माहिती ANI ने ट्विट करत दिली आहे. (Vijay Deverakonda)

या चित्रपटाद्वारे विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीत त्याचे पदार्पण अपयशी ठरले. 120 कोटी रुपयांचा बजेट असलेला हा चित्रपट मात्र केवळ बॉक्स ऑफिसवर 40 कोटी रुपयांचाच गल्ला जमवू शकला होता. या चित्रपटात विजय सोबत अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन, राजीव रॉय, मकरंद देशपांडे या कलाकारांनीदेखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

 

Web Title :- Vijay Deverakonda | makes of liger and actor vijay deverkonda questioned by enforcement directorate agency in hyderabad today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, धायरीतील घटना

MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश