Vijay Shivtare-CM Eknath Shinde | विजय शिवतारेंमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Vijay Shivtare-CM Eknath Shinde | त्यांचे आपापसात काय होईल ते होईल. ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल. पण आपण धनी नको व्हायला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संदर्भात बोलताना सांगितले,असा दावा शिवसेना नेते, माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आले असल्याची चर्चा रंगली आहे.(Vijay Shivtare-CM Eknath Shinde)

अजित पवार निवडणून येणार नाहीत. युतीची ती सीट जाणारच आहे. त्यामुळे फेरविचार करावा असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यावर शिंदे यांनी हे वक्तव्य केले असा दावा शिवतारे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंची भेट घेतली. या भेटीनंतर शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं याबद्दल माध्यमांना माहिती दिली.

शिवतारे म्हणाले की, स्वतःची सत्ता आणि सत्तेतून मिळालेली अराजकता झाली आहे, ती मोडण्यासाठी जनतेची इच्छा आहे.
म्हणून मी निवडणूक लढवणे गरजेचे आहे हे मी शिंदे यांना समजावून सांगितले. सगळी गणिते समाजवून सांगितली.
यामधून निश्चितपणे चांगला रिझल्ट येऊ शकतो. मी असेही सांगितले की, मी जरी निवडणुकीत नसलो तरी अजित पवार यांना बारामती मतदारसंघातून यश येणार नाही.

पण त्यांनी पुन्हा आपल्याला ऐकावे लागेल, युतीचा धर्म पाळावा लागेल असे सांगितले.
त्यामुळे दोन-चार दिवस वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करतो त्यानंतर आपण निवडणूक लढवण्याविषयी ठरवू असे
मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे शिवतारे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी