Video : अखेर विजयसिंह मोहिते-पाटील ‘भाजपवासी’

अकलुज : पोलीसनामा ऑनलाइन – अकलुज येथे काही वेळापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुण्यातील राजभवन येथे काल रात्री मुक्काम करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोहगाव विमानतळावरुन अकलुजला आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसने रणजितसिंह मोहिते पाटील यांना तिकीट देण्यास विलंब केल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा पासून विजयसिंह मोहिते पाटील काय करणार याविषयी चर्चा सुरु होती. आज अकलुज येथील सभेत मोहिते पाटील यांनी आपली ताकद दाखविण्यासाठी मोठे शक्तीप्रदर्शन केले. लाखाहून अधिक लोकांनी सभेच्या ठिकाणी गर्दी केली होती.

अकलुज (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा Live…

Policenama ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 16, 2019

अकलूज येथील सभेत खा. विजयसिंह मोहिते – पाटील, सुधाकरपंत परिचारक, आ. निलम गोरे, कांचन कुल, आ. प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते- पाटील, चंद्रकांतदादा पाटील, शहाजी पवार, उत्तमराव जानकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित राहिले.

You might also like