Vilas Lele | विलास लेले यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत  महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्षपदी निवड

पोलीसनामा ऑनलाईन – Vilas Lele | विलास लेले यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांत उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूर येथे पार पडलेल्या प्रांत कार्यकारिणीच्या बैठकीत विलास लेले यांची एकमताने निवड करण्यात आली. विलास अनंत लेले यांचे शिक्षण बीए पर्यंत झाले असून ३८ वर्ष किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये त्यांनी नोकरी करून २००६ साली ते निवृत्त झाले आहेत. (Vilas Lele)

१९८८/९० सालापासून ग्राहक चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता म्हणून दोन तपापासून ते ग्राहक पंचायत संस्थापक स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्यासोबत कार्य करीत त्यांनी ग्राहकांना न्याय मिळवा म्हणून विविध आंदोलने देखील त्यांनी केली आहेत. आजपर्यंत आ.भा. ग्राहक पंचायततीच्या सर्व पदांवर म्हणजेच सहसंघटक, संघटक, उपाध्यक्ष् अध्यक्ष, सचिव, प्रांत कोषाध्यक्ष तसेच राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष इ. सर्व जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

सातारा व पुणे जिल्हा पालक म्हणूनही यशस्वीपणे
लेले यांनी जबाबदारी पार पडलेली आहे. सध्या जळगाव जिल्हा पालक म्हणून जबाबदारी त्यांच्यावर आहे.
पोलीस कमिशनर ऑफिस पुणे येथे सुमारे दीड वर्ष वाहतूक पोलिसांना दर बुधवारी प्रबोधनात्मक मार्गदर्शन करीत होतो (वाहतूक पोलिसांची कामाची पद्धत व जनतेच्या अपेक्षा) आज पर्यंत दहा ते बारा वेळा कंझुमर कोर्टात बेंच मेंबर म्हणून लोक अदालतीचे काम केलेले आहे, तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य म्हणून तीन टर्म्स काम केलेले आहे.

आज पर्यंत दहा ते बारा वेळा कंझुमर कोर्टात बेंच मेंबर म्हणून लोक अदालतीचे काम केलेले आहे,
तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सदस्य म्हणून तीन टर्म्स काम केलेले आहे.
वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत उदा. दिशाभूल करणाऱ्या फसव्या जाहिराती,
फसवा एम.आर.पी ॲक्ट, ग्राहक संरक्षण कायदा, विमा पॉलिसी घेताना घ्यावयाची काळजी, पुण्यातील पाणी समस्या,
अतिक्रमणे व भीषण वाहतूक समस्या आदींवर त्यांनी लिखाण केले आहे.

ग्राहकांना कंजूमर कोर्ट व इतर अनेक विषय, याबाबत उत्तम मार्गदर्शन करणारे पुण्यातील “विनामूल्य मार्गदर्शन सेवा केंद्र”
आज पर्यंत गेली अनेक वर्ष उत्तम प्रकारे सांभाळलेले आहे.
पुणे येथील कार्यालयात ग्राहकांना कंझुमर कोर्ट प्रोसिजर व इतर विविध विषयांवर समाधान कारक मार्गदर्शन करीत
ते असतात. तसेच कोर्ट कचेरी टाळून समन्वयातून ग्राहकांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत.
तसेच तालुका व जिल्हा पातळीवर ग्राहक मार्गदर्शन व प्रबोधन कार्य करत त्यांच्यासोबत ते करत असतात.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Executive Engineer Kiran Deshmukh Suspended | पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख निलंबित, जाणून घ्या कारण

Pune Navale Bridge Accident | पुणे: नवले पुलाखाली विचित्र अपघात; 8 ते 9 वाहने एकामेकांना धडकली (Video)

PM Narendra Modi In Yavatmal | पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळमध्ये, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता

Sanjay Raut On BJP | राऊतांचा मोठा दावा, दोन्ही गटांना नड्डांनी सांगितले की, ”धनुष्यबाण, घड्याळाला लोक मतदान करणार नाहीत, त्यामुळे…”

Pune NCP News | प्रशांत जगताप यांच्यासह शरद पवार गटाच्या 9 जणांवर गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण (Videos)

बसची वाट पहात थांबलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हडपसर येथील प्रकार