नारायण राणेंच्या गडाला ‘सुरूंग’ लावणार्‍या खा. विनायक राऊतांची लोकसभेत शिवसेनेचा पक्ष नेता म्हणून निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेचा लोकसभेतील नेता ठरला असून वरिष्ठ नेते विनायक राऊत लोकसभेत शिवसेनेचे नेते असतील. महाराष्ट्रातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातील खासदार विनायक राऊत यांनी निवड शिवसेनेने लोकसभा नेते म्हणून केली आहेत. ते शिवसेनेतील एक वरिष्ठ नेते आणि अनुभवी नेते समजले जातात. या आधी त्यांचे नाव शिवसेना कोट्यातून मंत्री मंडळात समावेश करण्यासाठी घेण्यात येत होते. परंतू नंतर अरविंद सावंत यांनी मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून वर्णी लावण्यात आली. त्यामुळे आता विनायक राऊत यांची लोकसभेत पक्ष नेता म्हणून शिवसेनेने वर्णी लावली आहे.

कोण आहेत विनायक राऊत
विनायक राऊत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतील खासदार आहेत. त्यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे उमेवाद निलेश राणे यांचा पराभव केला आहे. विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा १ लाख ७८ हजार ३२२ मतांनी पराभव केला आहे. त्यांनी मागील २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत देखील निलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी निलेश राणे काँग्रेसचे उमेदवार होते.

शिवसेनेने महाराष्ट्रात यंदाही उत्तम विजय मिळवला, त्यांना १८ जागांवर विजय मिळवता आला, या विजयाने ते एनडीएतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला. ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागांवर विजय मिळवता आला. लोकसभेत चांगले यश मिळाल्यानंतर शिवसेनेने लोकसभेत उपसभापती पदावर देखील दावा केला आहे. परंतू असे असेल तरी उपसभापती पदावरुन अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

आरोग्य विषयक वृत्त

पावसाळ्यात आरोग्याची घ्या अशी काळजी

सावधान ! चायनीज फूड खाताय ? हे लक्षात असू द्या

‘यकृत’ निरोगी राहण्यासाठी महत्वाच्या टिप्स